एक्स्प्लोर

नाशिकच्या जागेचा पेच आणखी वाढणार! नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मोठी मागणी

Lok Sabha Elections 2024 : नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे नाशिकच्या जागेबाबत मोठी मागणी केली आहे.

Nashik Lok Sabha Constituency : काल (दि. 24) नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नाशिकची जागा शिवसेनेचीच, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.  यानंतर नाशिक भाजपचे पदाधिकारी आक्रमक होत थेट मुंबईला पोहोचले. नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. तसेच एकूण 100 नगरसेवक नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. नाशिकच्या जागेबाबत आमचे एकमत आहे. त्यासाठी आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

नाशिकला भाजपची ताकद अधिक

मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मनसेकडून नाशिक आणि शिर्डीच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. यावर देवयानी फरांदे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मेरीटचा विचार करता वरिष्ठांनी याबाबत विचार करावा, अशी आमची मागणी आहे.  जर त्यांची ताकद तिथे अधिक असेल तर त्यांना उमेदवारी द्यावी, मात्र आज फिल्डवरचा विचार केला, भाजपच्या ताकदीचा विचार केला तर भाजप नक्कीच श्रेष्ठ ठरत आहे. देवेंद्र फडणवीस देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत का? असा सवाल विचारला असता देवयानी फरांदे म्हणाल्या की, आम्ही सर्वांनी आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमची याबाबत सखोल चर्चा झाली आहे. त्यांना देखील हे माहीत आहे की, नाशिकला भाजपची ताकद अधिक आहे, असे त्या म्हणाल्या. 

नाशिकची जागा नेमकी कुणाला? 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. याबाबत देवयानी फरांदे म्हणाल्या की, जागा सर्वच मागतील. मात्र ज्यांची जास्त ताकद आहे. ज्यांचे लोकप्रतिनिधी आहे. त्यांना ही जागा मिळावी, असा आमचा आग्रह आहे. म्हणून आम्ही मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलो. दरम्यान, बैठकीला आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, दिनकर पाटील, केदा आहेर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  आता नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Hemant Godse : नाशिक लोकसभेवरून रस्सीखेच, हेमंत गोडसेंनी थेट घोषणाच करून टाकली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Superfast News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 25 March 2025 : 3 PmDisha Salian Case | दिशा सालियन प्रकरण; आरोपी कोण? आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख, वकील नेमकं काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 3PM 25 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकाल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget