एक्स्प्लोर
जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकल्याने चौघांच्या नाल्यात उड्या, दोघांचा मृत्यू
पोलिसांच्या एका पथकाला बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्या शेजारी जुगाराचा खेळ रंगला असल्याची माहिती समजली. पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकण्याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती जुगाऱ्याना समजली.
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्यात बुडाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तरुण पोलिसांची नजर चुकवून नाल्या काठी निर्जन जागेवर जुगार खेळत असताना पोलिसांचा छापा पडल्याच्या भीतीने पळून जाण्याचा नादात चार जुगारींनी मोठ्या नाल्यात उडी टाकली. त्यापैकी दोघे जण सुखरूप बाहेर पडले. मात्र दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतकांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. मृतकांमध्ये सोनू उर्फ इरफान शेख, जावेद इकबाल शेख यांचा समावेश आहे.
माहितीनुसार स्थानिकांनी काल रात्रीच्या वेळी नागपूर शहरातील 8 ते 10 तरुण जुगार खेळण्यासाठी बहादुरा गावाच्या नाल्या शेजारी गोळा झाले होते. पोलिसांच्या एका पथकाला बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्या शेजारी जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती समजली. पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकण्याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती जुगाऱ्यांना समजली.
पोलीस अटक करतील या भीतीने जुगाऱ्यांनी तिथून पळ काढला. त्यापैकी 4 जणांनी नाल्यात उडी घेतली. मात्र त्यापैकी दोघे नाल्याबाहेर पडले. मात्र दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता एकाचा मृतदेह सापडलेला असून एकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. आता खरोखर त्याठिकाणी पोलिसांचा छापा पडला होता की जुगारी अनामिक भीतीने मृत्यूच्या दाढेत ओढले गेले हे चौकशीत स्पष्ट होऊ शकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement