एक्स्प्लोर

Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं

Nagpur Crime News: मृत तरुणाचे नाव सागर वानखेडे आहे. तो पुण्यात नोकरी करत होता. होळी साजरी करण्यासाठी तो पुण्यावरून नागपुरात आपल्या गावी आला होता.

नागपूर: नागपुरात पत्नीने पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यावरून होळी साजरी करण्यासाठी गावी आलेल्या तरुणाचा भरदिवसा खून (Nagpur Crime News) करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी पती-पत्नी यांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी भरदिवसा घडलेल्या हत्येच्या (Nagpur Crime News) घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खापरखेडा-कोराडी रोडवर एका पती-पत्नीने मिळून एका तरुणावर धारदार चाकूने अनेक वार करत त्याची हत्या (Nagpur Crime News) केली. तपासात मृत तरुण आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सागर वानखेडे आहे. तो पुण्यात नोकरी करत होता. होळी साजरी करण्यासाठी तो पुण्यावरून नागपुरात आपल्या गावी आला होता. या प्रकरणात पोलिसांनी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये या दोघांना अटक केली आहे.(Nagpur Crime News)

लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि सागर यांच्यात शिक्षण घेत असताना पासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम होता. या प्रकरणाबाबत यापूर्वीही राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, होळी साजरी करण्यासाठी सागर पुण्यावरून आपल्या सावंगी गावात आला होता. त्याचवेळी त्याने इन्स्टाग्रामवरून सोनालीला मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले. 

सोनाली आपल्या सोबत चाकू घेऊन आली होती

आज (गुरुवारी, ता ५) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सागर खापरखेड्यात आला. श्याम मंगल कार्यालयाजवळ सोनाली त्याच्या बाईकवर बसून दोघे निघाले. यावेळी सोनाली आपल्या सोबत चाकू घेऊन आली होती. दरम्यान, राजू गजभिये यांनी मुलांना शाळेत सोडल्यानंतर दोघांचा पाठलाग सुरू केला. खापरखेडा-कोराडी रोडवरील कोलार नदीचा पूल पार केल्यानंतर सोनालीने मुद्दाम आपली पर्स खाली पाडली. सागर बाईक थांबवून पर्स उचलण्यासाठी खाली उतरला, तेवढ्यात सोनालीने चाकू काढून त्याच्यावर दोन वार केले. त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या राजू गजभिये यांनीही सागरवर अनेक वार केले. या हल्ल्यात सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर आरोपी पती-पत्नी घरी परतले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना रस्त्यातच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खापरखेडा आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Nagpur Crime News : अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती
अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
Vidarbha Heat: विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
सूर्य कोपला! विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget