Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
Commercial CNG Gas Nagpur price hiked by Rs 20 India suffers due to US Iran war Affect In India marathi news

Iran Israel Conflict Affect In India: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा (Iran Israel Conflict) आजचा सातवा दिवस आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू असून पश्चिम आशियात परिस्थिती दिवसागणिक अधिक तणावपूर्ण होत असल्याचे चित्र आहे. युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असं सगळं असताना या युध्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतोय. दरम्यान आता युध्दमुळे गॅस पुरवठा खंडित झाल्याचं संकट उभं ठाकलं आहे. परिणामी गो गॅसने नागपूरमध्ये (Nagpur News) आपल्या LPG स्टेशन वर वाहनांत लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात प्रति लिटर 8 रुपये 42 पैशांनी दरात वाढ केली आहे.
सबसिडी बंद, स्कुल बस आणि स्कुल व्हॅनसाठीचे दर थेट 20 रुपयाने वाढले (Iran Israel Conflict Affect In India)
मिळालेल्या माहितीनुसार, आज नागपूरमध्ये सीएनजी गॅसचे दरचे हे 64 रुपये 98 पैसे झाले आहे. स्कुल बस व स्कुल व्हॅनला गो गॅस 12 रुपये प्रति लिटर सबसिडी दराने सीएनजी गॅस पुरवत होते. आता हि सबसिडी बंद केल्याने स्कुल बस आणि स्कुल व्हॅनसाठी हे दर हि थेट 20 रुपयाने वाढले आहे. दुसरीकडे पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे. डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचवू लागल्यात. इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत रहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.
मध्य पूर्वेतील तणाव तेलावर कसा परिणाम करत आहेत? (Oil Prices How Affecting)
मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या युद्धामुळेही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या भू-राजकीय संघर्षाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठांवर जाणवत आहे. जगभरातील लोकांना आकर्षित करणारा सुगंधी बासमती तांदूळ आता दिल्लीच्या नया बाजारातून बाहेर पडू लागला आहे. निर्यात पूर्णपणे थांबली आहे आणि देशाचे व्यापारी, शेतकरी आणि अर्थव्यवस्था थेट त्याचा फटका सहन करत आहेत. सरकारने अशी रणनीती स्वीकारली आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यावर तेल कंपन्यांना त्यांचा नफा वाढवता येतो, तर जागतिक किमती वाढल्यावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करता येते. जागतिक वित्तीय सेवा कंपनी नोमुराच्या अहवालानुसार, तेल विपणन कंपन्या सध्या वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम सहन करत आहेत आणि तो थेट ग्राहकांना देत नाहीत.
भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड सुमारे १६.८ टक्क्यांनी वाढले आहे, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) सुमारे १४ टक्क्यांनी वाढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















