(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Metro News : नागपूर मेट्रोत पुन्हा दोन लाख प्रवासी संख्या ; तुडुंब गर्दीचा दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम
Nagpur : नागपुरात मेट्रो फेरीनंतर प्रवासी संख्या दोन लाखाच्या घरात पोचली आहे. 1, 96, 165 इतकी प्रवासी संख्या ही आजवरची दुसऱ्या क्रमांकाची संख्या ठरली नाही.
Nagpur Metro News : भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून महा मेट्रोने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सर्व कार्यक्रमांना आणि मेट्रोतून प्रवास करून गणतंत्र साजरा करण्यास नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण दिवसभर नागपूर मेट्रो तुडुंब गर्दी घेऊन धावत होती. शेवटच्या मेट्रो फेरीनंतर प्रवासी संख्या जवळ जवळ दोन लाखाच्या घरात पोचली. 1, 96, 165 इतकी प्रवासी संख्या ही आजवरच्या विक्रमी प्रवासी संख्येनंतरची दुसरी विक्रमी संख्या ठरली आहे.
विविध सणवारांच्या निमित्ताने महामेट्रो प्रवाशांच्या विविध सोयी-सुविधा तसेच काही मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. याच अनुषंगाने काल प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी झिरो माईल फ्रीडम पार्क येथे सकाळी योगासनांचे सादरीकरण त्यानंतर संध्याकाळी स्वरगंध संस्थेच्या वतीने तसेच 'ओपन माईक' शीर्षकाखाली देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
याशिवाय सीताबर्डी मेट्रो स्थानकावर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. दुपारी 'स्वरमधुर'' संस्थेच्या वतीने सांगीतिक कार्यक्रम आणि युवकांनी फ्लॅश मॉब सादर केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध स्थानकांवर त्रैरंगी रोषणाई करण्यात आली होती तसेच विविधरंगी रांगोळी काढून स्थानकांची सजावट करण्यात आली होती. अनेक नागपूरकरांनी सकाळी झेंडावंदनास जाण्यासाठी स्वतःच्या गाड्यांचा उपयोग न करता मेट्रोने जाणे पसंद केले, तर काहींनी अनुभव घ्यायला व आनंद साजरा करायला कुटुंबासह नागपूर मेट्रोने प्रवास केला. दिवसभर नागपूर मेट्रो तुडुंब भरून धावत होती. शेवटच्या फेरीनंतर एकूण प्रवासी आकडा 1,96,165 इतकी झाली.
मेट्रो भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात...
नवी आव्हाने प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतात. एक टप्पा गाठला की लगेच पुढच्या ध्येयाची तयारी सुरू होते. महा मेट्रोही असेच काहीसे करत आहे. महामेट्रोच्या टीमकडून होत असलेले काम हे पाठोपाठ यशाचे उत्तम उदाहरण आहे. सांघिक भावना असली कि नवीन उद्दिष्टे गाठणे अतिशय सोपे असते, हा संदेश महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी दिला. 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मेट्रो भवन येथे आयोजित झेंडावंदनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गिनीज आणि आशिया बुक दर्जाचे रेकॉर्ड स्थापन होणे हे महा मेट्रोच्या एकूणच कामाचे उदाहरण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत या सारख्या कार्यक्रमांमुळे नवीन प्रेरणा मिळते असे देखील ते म्हणाले. कार्यक्रमाला महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही बातमी देखील वाचा...