Nagpur Division : रेल्वे: लोडिंग-अनलोडिंग मशीनद्वारे होणार, मालवाहतुकीसाठी 1500 रुपये
सध्याचे कामगार शुल्क प्रति बॅग अपरिवर्तित ठेवण्याचा प्रस्ताव करारात आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर नागपूर विभाग आणि मध्य रेल्वेच्या इतर गुड्स शेडमध्ये राबविण्यात येणार आहे.
Nagpur News : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने (Central Railway Nagpur Division) अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (Dhamangaon) गुड्स शेड येथे 'सेमी मेकॅनाइज्ड गुड्स हँडलिंग'साठी पहिले नाविन्यपूर्ण कमाईचे कंत्राट दिले आहे. अमरावती (Amravati) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांतील गुड्स शेड प्रामुख्याने 'अन्नधान्य' आणि 'खते' च्या मालाची आवक वाहतूक आणि बीसीएन प्रकारच्या झाकलेल्या वॅगनमध्ये भरलेली जावक वाहतूक करतात. त्या मालाच्या शेडजवळ अपुऱ्या मजूर संख्येमुळे अनेकदा रेल्वे रोलिंग स्टॉक संपल्यामुळे मालवाहतूक महसुलात तडजोड होते. मोकळ्या वेळेत रेक क्लिअर न केल्यामुळे मालवाहतूक ग्राहकांना लेबर कार्टिंग चार्जेस आणि विलंब शुल्कामुळे जास्त पैसे द्यावे लागतात.
5 वर्षांचा करार
एक व्यवहार्य उपाय शोधण्यासाठी, सीआर मुख्यालयाच्या (Central Railway Headquarters) मार्गदर्शनाखाली नागपूर विभागाने एक नाविन्यपूर्ण कमाईचे कंत्राट दिले ज्याद्वारे परवानाधारक 24 तास वॅगनच्या किमान 50 टक्के 'सेमी-मेकॅनाइज्ड' लोडिंग-अनलोडिंगसाठी कन्व्हेयर बेल्ट लावल्या जाणार आहे. यामुळे ग्राहकांना प्रति वॅगन मालवाहतुकीसाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहेत. पाच वर्षांचा करार सर्व भागधारकांसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पैसे वाचवण्याचा प्रस्ताव
रोलिंग स्टॉकचे टर्मिनल डिटेन्शन कमी केल्यामुळे तसेच 'नॉन-फेअर रेव्हेन्यू' वाढल्यामुळे भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या महसुलात 23.01 कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. श्रमिक वाहतूक खर्चात कपात केल्यामुळे मालवाहतूक ग्राहकांना प्रति रेक सुमारे 13,700 रुपये वाचवण्याचा प्रस्ताव आहे. सध्याचे कामगार शुल्क प्रति बॅग अपरिवर्तित ठेवण्याचा प्रस्ताव करारात आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर नागपूर विभाग आणि मध्य रेल्वेच्या इतर गुड्स शेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
रेल्वेचे वेळापत्रक खोळंबलेलेच
अनेक दिवसांपासून खोळंबलेले रेल्वेचे वेळापत्रक अद्यापही सुरळीत झाले नसून दररोड गाड्या रद्द होण्याचे प्रमाण कायम आहे. शनिवारीही अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या तर अनेक गाड्या तब्बल 6 ते 7 तास उशिराने चालत आहे. शनिवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावरुन पुण्याला जाणारी 11040 ही महाराष्ट्र एक्सप्रेसही रद्द झाली. शिवाय या रुटवर चालणाऱ्या अनेक गाड्या उशिरा धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापासह आर्थिक भुर्दंडही बसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या