Anis Ahmad: उमेदवार निवडताना काँग्रेस सोशल इंजिनिअरिंगमध्ये फेल; काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेल्या अनिस अहमद यांचे सूचक विधान
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस राज्यात सोशल इंजिनिअरिंग मध्ये फेल झालं आहे. अनेक जातींना उमेदवारी देण्यात आलेली नाही. असा दावा काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेल्या अनिस अहमद यांनी केलाय.
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उमेदवार निवडताना काँग्रेस महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग मध्ये फेल झालं आहे. अनेक जातींना उमेदवारी देण्यात आलेली नाही. परिणामी, महाराष्ट्रात विपरीत निकाल पाहायला मिळतील. असा दावा काँग्रेस बडे नेते, माजी मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (All India Congress Committee) चे राष्ट्रीय सचिव राहिलेले आणि अलिकडे वंचितमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या अनिस अहमद यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या संभाव्य परफॉर्मन्स बद्दल त्यांनी हे सूचक विधान केलं आहे.
यंदा महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लियामेंट्री बोर्ड ने जे निर्णय घेतले आहे, त्यामध्ये त्यांनी अनेक समाजाना संधी नाही दिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाजाला उमेदवारी नाही. तेली समाजाला उमेदवारी दिलेली नाही. नागपुरात हलबा समाजाला टाळण्यात आले आहे. मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. यंदा महाराष्ट्र प्रदेश नेतृत्व सोशल इंजिनिअरिंग मध्ये पूर्णपणे फेल झालाय. काँग्रेसच्या संभाव्य परफॉर्मन्स बद्दल अनिस अहमद यांनी हे सूचक विधान केलं आहे.
काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही-अनिस अहमद
दरम्यान, अनिस अहमद यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने मध्य नागपूरमधून अर्ज भरण्याची संधी हुकली आहे. यावर बोलताना अनिस अहमद म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल न होऊ शकल्या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. आम्हाला मध्य नागपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील 29 तारखेचे व्हिडिओ फुटेज हवे आहे. दरम्यान माझा उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही, याच्याशी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही. मला कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांचा फोन आलेला नव्हता. तसेच माझा कुठलाही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं झालेलं नाही. असेही ते म्हणाले.
सोशल इंजिनिअरिंग मध्ये प्रदेश नेतृत्व फेल-अनिस अहमद
आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना तिकीट वाटप मध्ये काँग्रेसची चूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजासह दलित, तेली, बंजारा सर्व समाजाने मिळून 31 खासदार दिले. मात्र, यंदा तिकीट वाटपात जी चूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विपरीत निकाल पाहायला मिळतील. विशेष जातींना यंदा न्याय देण्यात आलेलं नाही. सोशल इंजिनिअरिंग मध्ये प्रदेश नेतृत्व फेल झालाय. अभ्यास करून उमेदवार द्यायला पाहिजे होते, मात्र आता निकाल धक्कादायक येऊ शकतात. निकाल आल्यानंतर समीकरण पाहून मी निर्णय करणार. असेही अनिस अहमद म्हणाले.
हे ही वाचा