एक्स्प्लोर
विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाचा भावाकडून खात्मा, नागपुरात खळबळ
नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरातील गुरु घासीदास गुरुद्वाराच्या परिसरात ही घटना घडली. नेहमी पूजेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात काल रात्री नागपूरच्या गुन्हेगारीचा काळा चेहरा समोर आणणारा दुर्दैवी प्रसंग घडला.
नागपूर : विवाहितेच्या घरात शिरून तिच्याशी छेडखानी करणाऱ्या गुंडाचा विवाहितेच्या भावाने खून केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेच्या घरासमोर झालेल्या वादानंतर देखील त्याच परिसरातच तो गुंड फिरत होता. अखेर त्या गुंडाची विवाहितेच्या लहान भावाने परिसरातील मंदिराच्या आवारातच हत्या केली. यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा थरार काल मध्यरात्री नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरात घडला.
नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरातील गुरु घासीदास गुरुद्वाराच्या परिसरात ही घटना घडली. नेहमी पूजेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात काल रात्री नागपूरच्या गुन्हेगारीचा काळा चेहरा समोर आणणारा दुर्दैवी प्रसंग घडला. विवाहित बहिणीच्या मागे हात धुवून लागलेल्या गुंडाला वारंवार समजावल्यानंतर ही तो ऐकत नसल्यामुळे एका 19 वर्षीय भावाला बहिणीला त्रास देणाऱ्या त्या गुंडाची हत्या करावी लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन चौरासिया नावाचा गुंड मिनिमाता नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेला त्रास द्यायचा. वारंवार बोलण्याचा प्रयत्न करणे, घरात येणे, अश्लील बोलून शरीर सुखाची मागणी करणे अशी कृत्य तो करायचा. कुणाला काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी रोशनने दिली होती. त्यामुळे परिसरात बदनामीच्या भीतीने विवाहितेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. काल रात्री गुंड रोशनने पुन्हा विवाहितेचं घर गाठलं आणि छेडखानी केली. विवाहितेने मदतीसाठी आपल्या लहान भावाला हाक मारली. यावेळी विवाहितेचा भाऊ राजा भारती आणि गुंड रोशन चौरासिया या दोघात वाद झाला.
या वादानंतर ही रोशन मिनिमाता नगर परिसरातून गेला नाही. तिथेच घुटमळत राहिला. थोड्या वेळानंतर गुरु घासीदास गुरुद्वारा परिसरात त्याने पुन्हा विवाहितेचा भाऊ राजा भारती सोबत वाद घातला. आणि चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हाणामारीत राजा भारतीने रागाच्या भरात गुंड रोशन चौरसियाच्या हातून चाकू हिसकावून घेत त्याची हत्या केली. बहिणीच्या अब्रूसाठी आपल्या हातून खून झाला याची कल्पना आल्यानंतर राजा पळून गेला नाही त्याने थेट कळमना पोलीस स्टेशन गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करत आत्मसमर्पण केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
Advertisement