Ashish Sakharkar Passes Away: जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन
Ashish Sakharkar Passes Away: बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन झालं आहे. बॅाडीबिल्डिंग जगतातलं एक मोठं नाव म्हणजे, आशिष साखरकर. बॅाडीबिल्डिंगमधील अनेक खिताब त्यानं आपल्या नावे केले आहेत.

Mr Universe Ashish Sakharkar Passes Away: जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर (Ashish Sakharkar) याचं निधन झालं आहे. आशिषनं देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक खिताब आशिषनं आपल्या नावे केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानंच आशिषचं निधन झालं. आशिष साखरकर म्हणजे, बॅाडीबिल्डिंग जगतातलं एक मोठं नाव. आज आशिषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
View this post on Instagram
चार वेळा मिस्टर इंडिया विजेता, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आशिष साखरकर म्हणजे, अनेक बॉडीबिल्डर्सचे रोल मॉडल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात आशिष साखरकर यांना बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील आयकॉन मानलं जातं. काही दिवसांपूर्वी आशिष साखरकर यांना आजारानं ग्रासलं होतं. याच आजारावर गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर उपचार घेते होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांचे चाहते आणि मित्रमंडळी श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
