एक्स्प्लोर

मुंबईत विरुष्काचं ग्लॅमरस रिसेप्शन

विरानुष्काच्या दिल्लीतील रिसेप्शन पार्टीपेक्षाही मुंबईतील रिसेप्शन आणखी जोरदार होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतील या रिसेप्शनला टीम इंडियातील बरेच खेळाडू हजर राहणार आहेत.

मुंबई :टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची लीडिंग लेडी अनुष्का शर्मा या नवदाम्पत्याच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मुंबईच्या सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं. या रिसेप्शनला सुरुवात होण्याआधी विराट आणि अनुष्का ही देखणी जोडी मीडियाच्या कॅमेऱ्यांना सामोरी गेली. विराटने जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्कानं सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. पंजाबी संस्कृतीनुसार परिधान केलेला लाल चूडाही अनुष्काच्या हातात उठून दिसत होता. विरानुष्काच्या या रिसेप्शनला क्रीडा आणि चित्रपटसृष्टीतले अनेक तारेतारका उपस्थित होते . त्या दोघांचा लग्नसोहळा ११ डिसेंबरला इटलीच्या सिएना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात संपन्न झाला. त्यानंतर २१ डिसेंबरला विरानुष्काच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन दिल्लीत पार पडलं होतं. मुंबईत विरुष्काचं ग्लॅमरस रिसेप्शन या रिसेप्शन पार्टीला टीम इंडियाचा माजी कोच अनिल कुंबळेनंही आवर्जून उपस्थिती लावली. त्यासोबतच माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबतच बुमरा, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव यांनीही हजेरी लावली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील या पार्टीला हजेरी लावली आहे. मुंबईत विरुष्काचं ग्लॅमरस रिसेप्शन विरुनुष्काचं हे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईच्या 'द सेंट रेजिस' या हॉटेलमध्ये होणार आहे. हॉटेलच्या नवव्या मजल्यावरील एस्टर बॉलरुममध्ये हे रिसेप्शन पार पडलं. hotel 'द सेंट रेजिस' हे मुंबईतील एक अलिशान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तब्बल 395 खोल्या, 27 सूट्स आणि 39 रेसिडेन्शल सूट्स आहे. एकमेकांसोबत कायमस्वरुपी प्रेमाच्या बंधनात अडकण्याचं वचन आज आम्ही घेतलं. ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असं कॅप्शन दोघांनीही दिलं. दरम्यान, विराट आणि अनुष्काचं लग्न हा या वर्षातील सर्वात चर्चेचा विषय होता. पण 11 डिसेंबरला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच विरानुष्काचा लग्न सोहळा इटलीमध्ये पार पडला होता. लोअर परेलमध्ये जंगी पार्टी लोअर परेलमधील हॉटेल St Regis मध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर, कतरिना कैफ, राणी मुखर्जीसह इतर सेलिब्रिटी सहभागी होतील. हॉटेलच्या गच्चीवर पार्टी हॉटेलच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीत 300 पेक्षा जास्त पाहुणे येण्याची शक्यता आहे. हॉटेलची सजावट फूल, लाईट आणि मेणबत्त्यांनी केली आहे. रात्री 8 वाजता विरुष्काच्या पार्टीला सुरुवात होईल. वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी सेलेब्रिटींना वेळेआधीच पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. क्रिकेटसह उद्योग विश्वातील दिग्गजांची हजेरी क्रिकेट विश्वातूनही अनेक दिग्गज रिसेप्शनला हजेरी लावणार आहे. दिल्लीतील रिसेप्शनमध्ये जे आले नव्हते, ते मुंबईत उपस्थिती लावतील. यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंहसह अनेक क्रिकेटरचा समावेश आहे. याशिवाय रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अनेक बिझनेस टायकूनही विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी येतील. दिल्लीच्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी विराट आणि अनुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन विशेषत: विराटच्या नातेवाईकांसाठी होतं. कारण विराटचं कुटुंब दिल्लीत राहतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावल्याने या सोहळ्याला चारचाँद लागले होते. याशिवाय रिसेप्शनमध्ये सुरेश रैना, गौतम गंभीर आणि शिखर धवननेही हजेरी लावली होती. संबंधित बातम्या : अनुष्का शर्माने केलेलं ट्विट ठरलं यंदाचं गोल्डन ट्विट मुंबईत आज 'विरुष्का'चं ग्रॅण्ड रिसेप्शन, 300 पाहुणे हजेरी लावणार!  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget