एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत भाजीपाला महागला; सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार मार्केट
मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये तर कांदा आता 130 च्यावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशीही मार्केट सुरु ठेवण्याचा निर्यण घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सद्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होवू नये यासाठी बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत.
बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सुट्ट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होवू शकते म्हणून शेतकऱ्यांना कांदा, बटाटा, टोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेवून येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरु राहणार आहेत.
ज्या जिल्ह्यामंध्ये कांदा, बटाटा आणि टोमंटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे, अशा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीय, सार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहीक सुट्ट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयांच्या वतीने परिपत्रकाद्वारे बाजार समित्यांना कळविले आहे.
कांद्या करणार वांदा -
नवी मुंबई एपीएमसी मार्केटला कांद्याची होणारी आवक घटल्याने याचा मोठा परिणाम कांद्यांच्या दरावर झाला आहे. 90 गाड्या कांदा एपीएमसीच्या कांदा मार्केटला दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यातील कांदा आवकीचा आकडा पाहता आज झालेली आवक अत्यल्प आहे. त्यामुळे आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ झालीय. नवीन कांदा शंभर रुपये तर जुना कांदा 120 रुपयांवर गेलाय. घाऊक बाजारात कांद्याच्या दराने शंभरी पार केल्यानं किरकोळ बाजारातही कांदा ग्राहकांना रडवणार असल्याचं दिसतंय. जुना कांदा संपत आला असून नविन कांद्याच्या पिकाला आवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. याचा थेट परिणाम कांद्यांच्या दरावर झाला आहे.
संबंधित बातम्या -
महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचणारा कांदा येतो कुठून?
कांदा रडवणार! आवक घटल्याने रिटेल मार्केटमध्ये कांदा 130 रुपयांवर जाण्याची शक्यता
नाशकातल्या हॉटेलांमध्ये कांदा नाही, खव्वयांवर कांद्याविना मिसळ खाण्याची वेळ | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement