एक्स्प्लोर

कांदा रडवणार! आवक घटल्याने रिटेल मार्केटमध्ये कांदा 130 रुपयांवर जाण्याची शक्यता

एपीएमसीत दर वाढल्याने किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा आता 130 च्यावर जाण्याची शक्यता आहे. नविन कांद्याचे पिक येण्यास फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याने पुढील दोन महिने कांद्याचे दर चढेच राहणार आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी मार्केटला कांद्याची होणारी आवक घटल्याने याचा मोठा परिणाम कांद्यांच्या दरावर झाला आहे. 90 गाड्या कांदा एपीएमसीच्या कांदा मार्केटला दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यातील कांदा आवकीचा आकडा पाहता आज झालेली आवक अत्यल्प आहे. त्यामुळे आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ झालीय. नवीन कांदा शंभर रुपये तर जुना कांदा 120 रुपयांवर गेलाय. घाऊक बाजारात कांद्याच्या दराने शंभरी पार केल्यानं किरकोळ बाजारातही कांदा ग्राहकांना रडवणार असल्याचं दिसतंय. जुना कांदा संपत आला असून नविन कांद्याच्या पिकाला आवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. याचा थेट परिणाम कांद्यांच्या दरावर झाला आहे. नवीन कांदा 100 रुपये तर जुना कांदा 120 रुपये किलोने एपीएमसी मार्केटला विकला गेला आहे. एपीएमसीत दर वाढल्याने किरकोळ मार्केटमध्ये हाच कांदा आता 130 च्यावर जाण्याची शक्यता आहे. नविन कांद्याचे पिक येण्यास फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याने पुढील दोन महिने कांद्याचे दर चढेच राहणार आहेत. दरम्यान बाहेरील देशांतील ईजिप्त आणि तुर्कीवरुन आलेला कांदा मुंबईबाहेर विक्रीला जात असल्याने येथील दर कमी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. Onion Rates Hike | कांद्याचं उत्पादन घटल्याने नव्या कांद्याला यंदा चांगला भाव | नाशिक | ABP Majha रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा पुरवण्याचा केंद्राचा विचार रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा पुरवठा करण्याचा विचार केंद्र सरकार करतं आहे. केंद्राच्या मुख्य सचिवांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा झाली. यावेळी कांद्याच्या साठवणूक आणि दराबद्दल आढावा घेण्यात आला. राज्य सरकारला कांद्याचा पुरेसा अतिरिक्त साठा करण्याच्या सूचनाही केंद्राच्या सचिवांनी दिल्या आहेत. शिवाय, व्यापाऱ्यांवर कांद्याच्या साठवणुकीचे बंधन घालून साठेबाजांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. इजिप्तकडून आयात केलेला सहा हजार नव्वद मेट्रिक टन कांदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात दाखल होणार आहे. याशिवाय तुर्कीकडून अकरा हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला असून हा कांदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल होईल. बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर रोगाचा प्रार्दुभाव एकीकडे कमी उत्पादनामुळे कांदा दहा हजारी पार करुन गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतांना दुसरीकडे मात्र तोच कांदा उत्पादक शेतकरी बदलत्या वातावरणामुळे त्रस्त झाला आहे. आधिच अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. लागवडीनंतर कांदा मोठा होऊ लागताच सकाळी पडणारे दवं, त्यानंतर ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पाती पिवळ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा वाढीवर परिणाम होऊन कांद्यावर करपा, मावा या रोगांचा प्रार्दुभाव वाढून कांदा खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget