..तर मी निवडणूक लढवणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब थोरातांना निरोप
काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहेत.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काँग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे संतापले आहेत. काँग्रेसने उमेदवार मागे घेतला नाही तर मी निवडणूक लढवणार नाही, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना पाठवला आहे. सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचं पाहयला मिळत आहे.
सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी केला संपर्क असल्याची सूत्रांची माहिती आहे. सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निरोप पाठवला.
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक
विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून येणे महत्वाचे असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार हे अजून निश्चित व्हायचं आहे. मात्र, प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 27 मे च्या आधी निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक महत्वाची आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या 6 जागा निवडून येऊ शकतात, असा विश्वास काँग्रेसला वाटतो.
MLC Election | विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार नावं निश्चित, दिग्गजांचा पत्ता कट
कसं आहे आकड्यांचं गणित या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे.
Vidhan Parishad Election | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार