एक्स्प्लोर
Advertisement
लोकल का खोळंबली, पूर्ववत कधी होणार, सर्व काही प्रवाशांना कळणार
मुंबई : लोकलसाठी ताटकळत उभं राहणाऱ्या मुंबईकरांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून लोकल खोळंबली तर त्याचं कारण आणि लोकलसेवा पूर्ववत होण्यास लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी आता प्रवाशांना चुटकीसरशी कळणार आहेत.
रेल्वे खोळंबली तर ती कशामुळे खोळंबली हे सांगणारे फलक स्टेशनवर लागणार आहेत. तसंच, रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागणार हे सुद्धा प्रवाशांना कळणार आहे. प्रवाशांच्या तक्रारीला तात्काळ उत्तर मिळावं आणि स्टेशन मास्तरांमागची डोकेदुखी कमी करण्यासाठी ही सुविधा करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
रेल्वेसाठी सुरु असणाऱ्या विकासकामांच्या फलकांचाही यात समावेश असेल.
स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार
नेहमीच पांढऱ्या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसू शकतील. यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या फँशन डिझायनर रितू बेरी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचं सुरेश प्रभूंनी म्हटलं आहे.
तसंच, नव्या ड्रेसकोड सोबतच स्टेशन मास्तरांच्या अधिकारांतही वाढ करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement