एक्स्प्लोर
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, सुधीर मुनगंटीवारच गोड बातमी देतील : संजय राऊत
उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.

मुंबई : युतीतली कोंडी काही सुटायचं नाव घेत नाही आहे. त्याचंपार्श्वभूमीवर भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपने भूमिका स्पष्ट करुन तासही लोटत नाही तोच शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 145 चं संख्याबळ असेल तर भाजपने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करावा असं राऊत यांनी भाजपला चिमटा काढली आहे. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याची गोड बातमी मुनगंटीवारच देतील अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवारांना टोला हाणला आहे. तसेच भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले.
अरविंद सावंत राजीनामा देणार का? युती तोडण्याच्या दिशेने शिवसेना पहिलं पाऊल टाकणार का?
राज्यपालांना आम्हीही भेटलो, विनोद तावडे भेटले, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस भेटले त्यांना कोणीही भेटू शकतो. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि चांगलं सरकार द्यावं असेही राऊत म्हणाले. तर भाजपचे सरकार येता कामा नये हे काँग्रेसचं मत असून त्यांच्या प्रमुख आमदारांनी याबद्दलच्या भावना कळावल्या आहेत. पण मी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असेही राऊत म्हणाले. काँग्रेस आमदारांच्या मागण्यांचं कौतुक करतो, स्वागत करतो. त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचं सरकार यावं. मला खात्री आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत राहणार नाही. तत्पूर्वी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. गोड बातमी कधीही येऊ शकते, त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. Sanjay Raut | शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही गोड बातमी मुनगंटीवार देतील, संजय राऊतांचा टोला | ABP Majha दरम्यान उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील सत्तासमीकरणं, शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. तसेचं आगामी काळात पक्षाने काय भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा होऊ शकते. त्यामुळे उद्याच्या शिवसेच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. Sudhir Mungantiwar PC | गोड बातमी कधीही येऊ शकते : सुधीर मुनगंटीवार | मुंबई | ABP Majha संबंधित बातम्याआमचं ठरलंय! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही; काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका
ओला दुष्काळ आढावा बैठक : शेतकऱ्यांच्या मागण्यावर चर्चा; सत्तास्थापनेचा तिढा कायम
जनतेचा कौल युतीला, त्यांनी सरकार स्थापन करावं : शरद पवार
सत्तास्थापनेसाठी सेनेचे भाजपसमोर 4 प्रस्ताव; मुख्यमंत्रीपदावर ठाम
संजय राऊत आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर दहा मिनिटं भेट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
