एक्स्प्लोर
Advertisement
अरविंद सावंत राजीनामा देणार का? युती तोडण्याच्या दिशेने शिवसेना पहिलं पाऊल टाकणार का?
विधानसभा निवडणूक युतीत लढली तरी शिवसेना आता भाजप बरोबर जाण्यास किंवा साधं भाजप आणि सेनेत संवाद ही नाही आहे. दररोज सेना आणि भाजप मध्ये फक्त आरोप प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे नुकताच दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली.
मुंबई : सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. भाजप असो शिवसेना असो किंवा आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी कोणीच आपली भूमिका स्पष्ट केली नाही. भाजप आणि शिवसेनेच्या युतीत सगळं फिस्कटल असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? यावर खलबत सुरू आहेत. शिवसेनेचा इतिहास पाहता ऐन वेळी शिवसेना मागे फिरली तर म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सध्या सार्वजनिक रित्या भूमिका घेणं टाळत आहे. विधानसभा निवडणूक युतीत लढली तरी शिवसेना आता भाजप बरोबर जाण्यास किंवा साधं भाजप आणि सेनेत संवाद ही नाही आहे. दररोज सेना आणि भाजप मध्ये फक्त आरोप प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे नुकताच दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेकडून स्पष्ट भूमिका अपेक्षित आहेत की ते खरचं भाजप कडून फारकत घेणार की नाही? यासाठी केंद्रातील मंत्री अरविंद सावंत राजीनामा देतील का याकडे लक्ष आहे. राज्यात शिवसेना आघाडीबरोबर आणि केंद्रात भाजप बरोबर हे योग्य होणार नाही. त्यामुळे शिवसेना फक्त खाती वाढवण्यासाठी किंवा दबावाच राजकारण करण्यासाठी आपला वापर करू नये,अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. म्हणूनच अरविंद सावंत यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा देणे हे शिवसेनेचे भाजपाबरोबर युती तोडण्याचे पहिले पाऊल असेल. शिवसेना खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करण्याबाबत गंभीर आहे याची खात्री या पक्षाना पटेल शिवसेना हे पाऊल उचलले का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देईल का? याकडे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेबरोबर खात्यांबाबत चर्चा करायला तयार असल्याचे आज भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं.. शिवसेना कोणच्या दिशेने पाऊल उचलणार की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement