एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जनतेचा कौल युतीला, त्यांनी सरकार स्थापन करावं : शरद पवार

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातल्या सत्ता संघर्ष, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अयोध्याचा नियोजित निकाल आणि दिल्लीतील पोलिस-वकिलांचं आंदोलन यावर भाष्य केलं.

मुंबई : "राज्यातील परिस्थितवर बोलण्यासारखं काही. आम्हाला मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी महाराष्ट्राच्या जनतेने दिली आहे. जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला आहे, त्यांनी तातडीने सरकार स्थापन करावं," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातल्या सत्ता संघर्ष, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अयोध्याचा नियोजित निकाल आणि दिल्लीतील पोलिस-वकिलांचं आंदोलन यावर भाष्य केलं. विरोधी पक्षात बसणार ही तुमची आताची भूमिका भविष्यात बदलू शकते का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, "आम्हाला जनतेचा कौलच विरोधी पक्षात बसण्यासाठीचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आकडे बहुमतापर्यंत जुळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे." राज्यसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राऊतांशी चर्चा : शरद पवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सिल्वर ओक इथे शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये केवळ दहा मिनिटांची भेट झाली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल अशी अपेक्षा होती. परंतु संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमीसारखे भेटायला आले होते. राज्यसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेतील ही अपेक्षा : शरद पवार राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अनुकूल नसल्याचं समजतं. काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं या मताचा आहे. मात्र दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे पाठिंबा देऊ नये, असं मत दुसऱ्या गटाचं आहे. परिणामी काँग्रेसचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबद्दल शरद पवार म्हणाले की, "काँग्रेसचा निर्णय काय हे अद्याप आमच्या कानावर आलेला नाही. आम्ही एकत्रित निवडणूक लढलो, त्यामुळे निर्णय एकत्रित घ्यावा, अशी आमची भावना आहे." अहमद पटेल-नितीन गडकरी भेटीविषयी काय म्हणाले? दिल्लीत आज काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीविषयी विचारलं असता शरद पवार यांनी स्मितहास्य करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "गडकरींकडे कुणी गेलं असेल तर ते जरुर रस्त्यांच्या कामासाठी गेलं असणार. अहमद पटेल जबाबदार व्यक्ती असून ते दुसऱ्या कुठल्या कारणासाठी भेटले असतील असं वाटत नाही." दरम्यान, बहुमत नसतानाही अमित शाहांनी मागच्या काळात सरकारं स्थापन केली आहेत, मग महाराष्ट्रात ते लक्ष घालत नाहीत असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "त्यांच्या या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय. त्यांनी सरकार बनवावं."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget