एक्स्प्लोर
मुंबई लोकल : मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द
ठाकुर्ली येथील उड्डानपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज सकाळी 9.15 ते 12.45 पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेने ठाकुर्ली येथील उड्डानपुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज सकाळी 9.15 ते 12.45 पर्यंत हा विशेष ब्लॉक असणार आहे.
या मेगा ब्लॉकदरम्याम मध्य रेल्वे मार्गावरील काही लोकलच्या फेऱ्यांप्रमाणेच मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. ठाकुर्लीतील या उड्डानुपुलाचं काम झाल्यानंतर प्रवाशांना बराच फायदा होणार आहे.
मुंबई-पुणे डेक्कनक्वीन, मनमाड-मुंबई पंचवटी, एलटीटी मनमाड-गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक आणि पुण्यावरून मुंबईत येणाऱ्या गाड्या कल्याणच्या आधीच थांबविण्यात येणार आहेत.
या वेळेत सीएसएमटी ते कसारा, आसनगाव, टिटवाळा आणि कर्जत, बदलापुर, अंबरनाथ मार्गावरील अप आणि डाऊन सेवा बंद राहणार आहेत. शिवाय बाहेरच्या राज्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेसही कल्याण स्थानकातच थांबवण्यात येणार आहेत.
या मेगाब्लॉ़कमुळे डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन आणि अप धीम्या व जलद मार्गावर लोकल सेवा बंद राहतील. तसेच सकाळी सीएसएमटी ते कसारा, आसनगाव, टिटवाळा आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ मार्गावरील अप व डाऊन सेवा बंद राहणार आहेत.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आज कोणत्याही प्रकारचे अभियांत्रिकी काम हाती घेण्यात येणार नसल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु राहिलं.
तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर काल (दि. 20 ऑगस्ट) मध्यरात्री बोरिवली ते भाईंदर दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement