एक्स्प्लोर

शीना बोरा हत्याकांड प्रकरण; पीटर मुखर्जीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकारात पीटरचा थेट सहभाग असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचं निरिक्षण नोंदवत हायकोर्टानं पीटर मुखर्जीला 2 लाखांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयनं याला जोरदार विरोध करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली. जी मान्य करत हायकोर्टानं या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती नीतीन सांबरे यांनी गुरूवारी हा निकाल जाहीर केला. याआधी अनेकदा पीटरनं केलेल्या जामीनासाठीचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पीटरला तात्पूरता जामीन मंजूर केला होता. प्रकृती अस्वस्थ्याचं कारण लक्षात घेत पीटरला त्याच्या पसंतीच्या खाजगी रूग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास हायकोर्टानं परवानगी दिली होती. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सातवा जामीन अर्ज होता. विशेष सीबीआय कोर्टानं जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरनं हायकोर्टात अर्ज केला होता. तपास यंत्रणेकडे आपल्या विरोधात सबळ पुरावे नाहीत, असा पीटरचा या याचिकेत दावा होता. पीटर मुखर्जीला 16 मार्च 2019 ला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर कोर्टाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून पीटर मुखर्जीची प्रकृती काहीशी नाजूकच आहे. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची हत्या साल 2012 मध्ये इंद्राणीने घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या कटाची संपूर्ण माहिती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही होती, असा सीबीआयचा आरोप आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर तीन वर्षांनी या प्रकरणाचे गूढ उलगडले होते. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीनं, तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि आपला ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यासाथीनं शीनाची हत्या केली होती. श्यामवर रायला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक झाली होती, ज्याच्या चौकशीत या हत्याकांडाची माहिती मिळाली. पुढे श्यामवर राय हा माफीचा साक्षीदार झाल्यानं या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange Protest : नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अखेर स्थगितMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
PM Modi Pune Visit: पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट
लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
Pune Metro: आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
Embed widget