एक्स्प्लोर
राज ठाकरेंच्या दादरमधील सभेचं ठिकाण ठरलं!
मुंबई: दादरमधील दत्ता राऊळ मैदानावरुन शिवसेनेशी सामना सुरु असताना, आता मनसेला राज ठाकरेंच्या सभेसाठी नवी जागा मिळाली आहे.
मनसेला उद्याची शेवटची सभा घेण्यासाठी दादरमधील कबुतरखान्याजवळ परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज ठाकरेंची शनिवारची सभा आता कबुतरखान्याजवळ होईल.
दत्ता राऊळ मैदानावरुन वाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी शिवसेनेनं दादरमधलं दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला.
शिवसेनेचा दावा
मात्र शिवसेनेने हे मैदान दोन-चार दिवसात नव्हे तर खूप आधीच बूक केलं आहे. त्यामुळे कधीही झोपेतून उठून मैदान मागणाऱ्यांना का देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी घेतली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या संध्याकाळी बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे. असं असताना त्याचवेळी शिवसेनेला दुसऱ्या मैदानाची गरज का आहे? असा सवाल मनसेनं विचारला आहे.
मात्र दत्ता राऊळ मैदानावर शिवसेनेचे इतर नेते सभा घेणार असून, ते मैदान आपण आधीच आरक्षित केल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.
संबंधित बातम्या
दादर मैदानावरुन शिवसेना-मनसे आमने-सामने
फडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील : आदित्य ठाकरे
'सामना'वर बंदी घालू देणार नाही : व्यंकय्या नायडू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
बॉलीवूड
Advertisement