एक्स्प्लोर
पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर
मुंबई : निजामाचं राज्य असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. भाजपने पोस्टर्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय, उद्धव ठाकरे यांची तुलना बेडकाशी केली आहे.
(पाहा फोटो : पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर )
देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने नाही चालत... त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा सामना करावा लागतो..." अशा आशयचंही एक पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या सर्व पोस्टर्सवर 'i support NaMo!' अशी ओळ आहे.(पाहा फोटो : पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर )
या पोस्टर्समधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तुलना अरविंद केजरीवाल आणि दिग्विजय सिंग यांच्यासोबत केली आहे. शिवाय, वेगवेगळ्या पद्धतीने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.(पाहा फोटो : पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर )
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वाद सातत्याने वाढताना दिसत आहे. अर्थात याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. मात्र, एकाच सरकारमधील दोन पक्ष कधी अप्रत्यक्षपणे तर कधी प्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement