एक्स्प्लोर
Advertisement
मोठ्या ब्रॅण्ड्सच्या बनावट वस्तूंच्या विक्रीसाठी हुबेहूब पॅकेजिंग, पोलिसांकडून 25 कोटींचा माल जप्त
भिवंडीमधील एका गोदामात एचपी, कॅनॉन, सॅमसंग, व इपसॉन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या वस्तूंचे बनावट पॅकेजिंग केले जाते. त्यासाठी वापरले जाणारे सुमारे 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्ठ्याचे साहित्य (बनावट वेष्टन) पोलिसांनी छापा घालून जप्त केले आहे.
मुंबई : अनेक ठिकाणी जगभरातल्या मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या नावाने बनावट वस्तूंची विक्री केली जाते. त्यासाठी संबंधित कंपन्यांसारखे पॅकेजिंग केले जाते. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी पकडले आहे. तसेच ओरिजनल कंपनीसारखे पॅकेजिंग करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे 25 कोटी रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंडमध्ये एचपी, कॅनॉन, सॅमसंग, व इपसॉन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या वस्तूंचे बनावट पॅकेजिंग केले जाते. त्यासाठी वापरले जाणारे सुमारे 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्ठ्याचे साहित्य (बनावट वेष्टन) पोलिसांनी छापा घालून जप्त केले आहे. तसेच पोलिसांनी या छाप्यावेळी एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर आंबा बेरा (28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
संबंधित गोदामात अनधिकृतपणे पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान आरोपींवर कॉपिराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 आणि कलम 63 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉपिराईट अॅक्ट अन्वये करण्यात आलेली ही देशातील मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या पकेजिंग बॉक्सचा वापर ऑनलाइन विक्रीसाठी होतो का? तसेच या गुन्ह्यामध्ये अजून कोण सहभागी आहेत? पोलीस याचा तपास करत आहेत.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement