एक्स्प्लोर
Advertisement
मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला त्याच्या मुलीसह ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी जबरदस्तीने मातोश्रीबाहेरुन ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याच नाव देशमुख असून ते आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. या शेतकऱ्याला पोलीसांनी ठाण्यात बसवून ठेवलं होतं. मात्र, कोणत्याही माध्यम प्रतिनिधीस संवाद साधण्यास मज्जाव केला. दरम्यान, पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. संबंधीत शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करुन त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले.
देशमुख नावाचे शेतकरी आपल्या समस्या घेऊन पनवेलहून मुंबईत आले होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, तरीसुद्धी बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. त्यांच्यासोबत आठ वर्षांची मुलगीही होती. मात्र, दोनतीन तासांनंतरही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांनी मातोश्रीच्या आत जाऊ देण्याची विनंती पोलीसांना केली. ही विनंती नाकारत पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याच प्रयत्न केला. यावेळी देशमुख आणि त्यांच्या मुलीला थोडी धक्काबुक्कीही झाली. मातोश्रीबाहेर दिवसभरातून अनेकजण येतात. त्यामुळे अशा प्रकारे आम्हाला वागावे लागते, अशी प्रतिक्रिया पोलीसांनी दिली आहे.
शेतकऱ्याला भेटू देण्यास पोलीसांचा विरोध -
देशमुख यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. त्यावरुन बँक त्याची अडवणूक करत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी मुख्यमंत्री कार्यलयात आपला अर्ज सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री कार्यलयाचा शिक्का आहे. मात्र, मुख्यमंत्री आज त्यांना वेळ देऊ शकत नाही. आज बँकांना सुट्टी आहे, अशा प्रकारे प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांना भेटायला आला तर अवघड होईल, अशी प्रतिक्रिया पोलीसांनी दिली आहे. शेतकरी देशमुख म्हणाले माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. तरीही माझीही समस्या सुटत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो आहे. दरम्यान, आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्यांना अटकाव केला.
देवेंद्र फडणवीसांची टीका -
मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होतोच आहे. पण अवघ्या 8 वर्षांच्या लहान मुलीला 'मातोश्री'बाहेर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील जनतेने अपेक्षा करायची तरी कुणाकडून? मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी, असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Farmer | मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेला शेतकरी मुलीसह पोलिसांच्या ताब्यात | ABP Majhaशेतकऱ्यांवर तर सातत्याने अन्याय तर होतोच आहे. पण अवघ्या 8 वर्षांच्या लहान मुलीला 'मातोश्री'बाहेर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील जनतेने अपेक्षा करायची तरी कुणाकडून? मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी !#ShameOnShivSena pic.twitter.com/tcbHTpqMl3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
महाराष्ट्र
Advertisement