एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहप्रवाशाला लोकलमधून फेकून देण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
विरार : लोकलमधील दारावर उभा राहिलेल्या मग्रुर प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला फेकून देण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. याप्रकरणी धमकी देणाऱ्या प्रवाशावर वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पण न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली.
28 फेब्रुवारी रोजी भाईंदरमधून चर्चगेटकडे जाण्यासाठी योगेश परमार लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होते. पण दारावर उभ्या असलेल्या ग्रुपमधील हरिश सिंग या मग्रुर व्यक्तीने त्यांना लोकलमध्ये चढण्यास विरोध केला. यावेळी दोघांमध्ये धक्काबुकी झाली. यात सिंगने परमार यांना शिवीगाळ करून लोकलमधून त्याला ढकलून देण्याची धमकी दिली.
प्रवाशांची ही दादागिरी परमार यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. या व्हिडिओच्या आधारे त्यांनी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर रेल्वे पोलिसांनी 1 मार्च रोजी सापळा रचून धमकी देणाऱ्या प्रवाशाला अटक केली. त्याला रेल्वेच्या कोर्टात उभे केले असता, कोर्टानं दहा हजार रुपयाचा दंड ठोठावून सोडून दिलं.
दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई-विरारवरुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कारण, बोरिवलीनंतर, दहिसर, मिरारोड, भाईंदर या स्थानकावरुन लोकलमध्ये चढताना प्रवाशांना रोज तारेवरची कसरत करावी लागते. त्यात ग्रुपमधील मंडळी रोजच्या प्रवाशा जागा करुन देतात. पण नवीन प्रवाशाला, दमदाटी करुन हुसकावून लावण्याचे प्रकार दिवासगणिक वाढत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement