एक्स्प्लोर
नवी एसी लोकल! एका डब्यातून दुसऱ्यात जाण्यास मार्गिका
या लोकलमध्ये टॉकबॅक सिस्टीम, जीपीएस अशा नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीला सोलर पॅनल लावण्यात आले आहेत

मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत दुसरी एसी लोकल दाखल होत आहे. नवीन एसी लोकलचं आज आयसीएफमध्ये उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे या एसी लोकलच्या एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यास मार्गिका करण्यात आली आहे. या नवीन लोकलचे एक्स्क्लुझिव्ह फोटो फक्त 'एबीपी माझा'च्या हाती आहेत.
या लोकलमध्ये अनेक नवनवीन फीचर्सचा समावेश आहे. ही लोकल जलद असून दरवाजांची उघड-बंद होण्यास कमी कालावधी लागतो. एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यास मार्गिका तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदाच लोकलमध्ये ही पद्धत वापरण्यात येईल.
या लोकलमध्ये टॉकबॅक सिस्टीम, जीपीएस अशा नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीला सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा घेऊन ही लोकल धावेल. सौर्यऊर्जेचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
पाहा नवीन एसी लोकलचे एक्स्क्लुझिव्ह फोटो
पुढच्या महिन्यात ही लोकल चेन्नईहून मुंबईला येईल. त्यानंतर काही चाचण्या करुन ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. ही लोकल आल्यावर शनिवार-रविवारही एसी लोकल धावण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे याबाबत नवीन टाईमटेबल तयार करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात पहिली एसी लोकल मुंबईत आली होती. त्यानंतर वर्षभराने पुढची एसी लोकल सेवेत दाखल होणार आहे.

आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
Advertisement