एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबईत हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल
सिंधुदुर्गमधील देवगडचे शेतकरी प्रकाश शिरसेकर यांनी हापूस आंबा पाठवला आहे.
नवी मुंबई : हापूसप्रेमींसाठी खुशखबर आहे. फळांचा राजा हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे.
हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल होण्यासाठी जानेवारी महिना उजाडतो. मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच पेटी आल्यानं शेतकरी आणि व्यापारीवर्गात आनंदाचं वातावरण आहे.
सध्या कोकणातील हवामान आंब्याला पोषक आहे. सिंधुदुर्गमधील देवगडचे प्रकाश शिरसेकर या शेतकऱ्यानं हापूस आंबा पाठवला आहे.
सीझनच्या पहिल्या आंब्याच्या पेटीला तब्बल नऊ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. प्रशांत राणे या घाऊक व्यापाऱ्यानं हाऊस आंब्याच्या पेटीची पूजा केली.
दोन महिने आधीच आंबा बाजारात आल्यानं यंदा आंब्याची जास्तीत जास्त चव चाखता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement