एक्स्प्लोर
रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन
31 जुलैची निकालाची डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापाठीने आता 5 ऑगस्टची नवीन डेडलाईन दिली आहे.
मुंबई : 31 जुलैची निकालाची डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापाठीने आता 5 ऑगस्टची नवीन डेडलाईन दिली आहे. सध्या रखडलेले निकाल लावण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण पेपर असेसमेंटचा सर्व्हर सध्या डाऊन आहे.
शिवाय आज घाईघाईत निकाल लावल्याने निकालाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्हं निर्माण होत आहे. 31 जुलैची डेडलाईन संपण्याआधी मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखेतील 153 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर अजूनही इतर शाखेतील 324 परीक्षांचे निकाल प्रतीक्षेत असून 90 टक्के मूल्यांकन झाल्याची माहिती आहे.
दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कारभारला कंटाळून अर्थशास्त्र विभागप्रमुख नीरज हातेकरांनी स्वेच्छा निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी ही माहिती दिली.
मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या निकालांमध्ये कलाशाखेचे 78, तंत्रज्ञान विभागाचे 48, विज्ञान शाखेचे 10, व्यवस्थापन शाखेचे 10, वाणिज्य शाखेचे 7, असे एकुण 153 निकाल जाहीर करण्यात आले आहेत. वाणिज्य व विधी शाखेचे निकाल वगळता बहुतांश शाखेतील 90 ते 98 टक्के मुल्यांकन झाल्याचं विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. उर्वरित 55 निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतल्याने मुंबई विद्यापीठाने मुल्यांकनाच्या कामासाठी नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठांची मदत घेतल्याचंही विद्यापीठाने स्पष्ट केलं. एकूण 17 लाख 36 हजार 145 उत्तरपत्रिकांपैकी 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झालं आहे, तर 3 लाख 25 हजार 305 उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन लवकरच विद्यापीठातर्फे केलं जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement