एक्स्प्लोर
मुंबईतील मेघना अगवणेच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
मुंबई : मुंबईतील गोरेगावच्या मेघना अगवणेच्या मृत्यूप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेजाऱ्यांच्या मारहाणीत नव्हे तर वडिलांकडूनच चुकून चाकू लागल्याने मेघनाचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
त्यामुळे आता मेघना अगवणेच्या वडिलांनाच याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे.
मुंबईत किरकोळ वादातून शेजाऱ्यांकडून 15 वर्षीय तरुणीची हत्या
15 वर्षीय मेघना सोमवारी सकाळी शिकवणीवरुन परत येत होती. त्यावेळी नुकतंच साफ केलेल्या रस्त्यावरुन जाण्यास तिला शेजाऱ्यांनी मनाई केली. त्यावरुन झालेल्या भांडणात मेघनाच्या पायावर बादली मारण्यात आली. संध्याकाळी पुन्हा झालेल्या बाचाबाचीनंतर 10 ते 12 जणांनी मेघना आणि तिची बहीण पूजाला घरात घुसून बेदम मारहाण केली. यावेळी शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मेघनाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता.
मात्र शेजाऱ्यांसोबत भांडण सुरु असताना, मेघनाच्या वडिलांच्या हातातील चाकू लागून तिचा छातीत लागल्याने मृत्यू झाल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement