एक्स्प्लोर
रस्ते घोटाळ्यात मुंबई महापालिकचे दोन इंजिनिअर्स अटकेत
मुंबई : मुंबई रस्ते घोटाळ्याप्रकरणी पहिल्यांदाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. पालिकेच्या दोन अभियंत्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पालिकेचे मुख्य अभियंते अशोक पवार आणि उदय मुरुडकर यांना अटक झाली आहे. यापूर्वी कंपनीच्या लेखापाल आणि इंजिनिअर्सना अटक करण्यात आली होती. पण आता थेट पालिकेच्या अभियंत्यांना अटक झाली.
मुंबईतल्या रस्ते बांधणीत घोटाळा झाला होता. याप्रकरणी हायकोर्टानंही ताशेरे ओढले होते. काळ्या यादीतील कंत्राटं रद्द केली, मात्र पालिकेतील एकाही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. तर रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदार अजूनही फरार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement