एक्स्प्लोर
राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, शिवसेना भवनसमोर मनसेचं पोस्टर
गणेश उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप घालण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहेत.
मुंबई : गणेशोत्सव वादावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेने शिवसेना भवनाबाहेर पोस्टर लावले आहेत. "अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा...पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा," अशा आशयाची हे पोस्टर आहेत.
गणेश उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप घालण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहेत. यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मुंबई महापालिकेत सत्ता असूनही शिवसेना त्याबाबत मौन बाळगत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच महिन्यात अयोध्याला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र तुम्हाला अयोध्याला जायचं असेल तर जा, पण आधी गणेशोत्सवासाठी आवश्यक त्या परवानग्या तर आम्हाला द्या, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. त्यामुळे होर्डिंग लावून मनसे शिवसेनेला लक्ष्य करत आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement