एक्स्प्लोर
957 दिवसात 25 कोटी प्रवासी, मुंबई मेट्रोची विक्रमी वाटचाल
मुंबई : दोन वर्ष आणि सात महिन्याच्या कालावधीत मुंबई मेट्रोमध्ये 25 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना सेवा देणारी मेट्रो ठरली आहे.
जून 2014 मध्ये घाटकोपर ते वर्सोवा अशा साडेअकरा किलोमीटरच्या मार्गावर मुंबई मेट्रो सुरु झाली.त्यामुळे मुंबईच्या पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली. 25 कोटी प्रवासीटप्पा गाठण्यासाठी मुंबई मेट्रोला अवघे 31 महिने (957 दिवस) लागल्याचं अभिमानाने सांगितलं जात आहे.
दिल्लीत 65 किलोमीटर मेट्रोचं जाळं आहे. मात्र 25 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठण्यासाठी दिल्ली मेट्रोला 5 वर्षे लागली, तर कोलकात्यातल्या मेट्रोला हाच आकडा गाठण्यासाठी सात वर्षे लागली होती.
मुंबई मेट्रोने 786 दिवसांमध्ये 20 कोटींचा प्रवासीटप्पा गाठला होता. त्यानंतर 171 दिवसांत पुढील पाच कोटी प्रवाशांचा कोटा पार पडला. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी यासारखे स्पर्धक असतानाही मुंबई मेट्रोतून नागरिक प्रवास करत असल्याची बाब अभिमानास्पद आहे, असं मेट्रो प्राधिकरणातर्फे सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement