एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहा मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या पुलाचं पाडकाम सुरु, जेसीबीच्या साहाय्याने तोडकाम, लोखंडी सांगाडाही हटवणार
जेसीबी आणि मशीनच्या साहाय्याने हे तोडकाम केले जात आहे. काल दुर्घटना घडल्यानंतर या पुलाचा काही भाग पाडण्यात आला होता. आता उर्वरीत भाग पाडण्याचं काम सुरु आहे. जेसीबीच्या सहाय्याने या पुलाचं पाडकाम केलं जातं आहे.
मुंबई : सहा निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या पुलाचे पाडकाम सुरु झाले आहे. जेसीबी आणि मशीनच्या साहाय्याने हे तोडकाम केले जात आहे. काल दुर्घटना घडल्यानंतर या पुलाचा काही भाग पाडण्यात आला होता. आता उर्वरीत भाग पाडण्याचं काम सुरु आहे. जेसीबीच्या सहाय्याने या पुलाचं पाडकाम केलं जातं आहे.
दरम्यान या पुलाचा लोखंडी सांगाडा देखील हटविला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
VIDEO | युतीच्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरे अमरावतीत,ब्रिज कोसळल्यानंतर ना जखमींची भेट ना घटनास्थळाची पाहणी | एबीपी माझा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 34 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
CSMT पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूसही नाही, उद्धव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर दरम्यान, मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रचारासाठी अमरावतीला रवाना झाले आहेत. सीएसएमटीतील पूल अपघाताला कित्येक तास उलटूनही ना उद्धव ठाकरे घटनास्थळाकडे फिरकले, ना आदित्य ठाकरेंनी जखमींची विचारपूस केली. मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई महापालिकेचा पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. मात्र मुंबईचे कारभारी समजणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घटनास्थळाला भेट देण्याचं किंवा जखमींची विचारपूस करण्याचं सौजन्य दाखवलं नाही. ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे, त्याच महापालिकेच्या निष्काळजीमुळे पुलाचा भाग कोसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव आणि आदित्य यांनी केलेलं दुर्लक्ष असंवेदनशीलतेचं मानलं जात आहे. निवडणुका तोंडावर आल्याने प्रचाराला जाण्यात काहीच चूक नाही. मात्र ज्या 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे राहतात तिथून घटनास्थळ फक्त 18 किलोमीटरवर आहे. परंतु मतांच्या बेगमीसाठी उद्धव ठाकरेंनी तब्बल साडेपाचशे किलोमीटरवर असलेली अमरावती जवळ केली. शिवसेना-भाजप युतीच्या संयुक्त प्रचारसभेला उद्धव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, ते राष्ट्रहिताचे होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मात्र पूल दुर्घटनेविषयी चकार शब्दही काढला नाही. दुसरीकडे महापालिकेने अद्यापही या दुर्घटनेबद्दल कुणावर ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.संबंधित बातम्या
पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका
पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप
'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे
रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement