एक्स्प्लोर
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अपघात; एक जखमी, एक बेपत्ता

मुंबई : मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रात्री एक विचित्र अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी तर एक बेपत्ता झाला आहे.
घाटकोपरमधील रमाबाईनगरजवळ एक दुचाकीस्वार रात्री नाल्याच्या भिंतीवर आदळला आणि नाल्यात जाऊन पडला. हरीश गोडसे असं त्या दुचाकीस्वाराचं नाव आहे.
यानंतर हरीशला नाल्याबाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. पण या अपघाताच्यावेळी हरीशच्या दुचाकीवर असलेला एक जण अजूनही बेपत्ता आहे.
पोलिस आणि अग्निशमन दल त्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























