एक्स्प्लोर
खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता खोदला
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे आंदोलन करत मनसेने सरकारचा निषेध केला. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई : रस्त्यांच्या दुर्दशेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी मध्यरात्री मनसेने थेट मंत्रालयाबाहेरील रस्ता खोदला. मनसेने मंत्रालयाबाहेरील पेव्हर ब्लॉक टिकावाच्या सहाय्यानं उखडले. मुंबईसह महाराष्ट्रात पडलेल्या खड्ड्यांचा मनसेकडून निषेध करण्यात येत आहे.
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे आंदोलन करत मनसेने सरकारचा निषेध केला. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सायन-पनवेल महामार्गाची रस्त्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. यासाठीच मनसेकडून हे आंदोलन करण्यात आले.
तुर्भेतलं PWD चं ऑफिस फोडलं
सोमवारी मनसेनं तुर्भेतल्या पीडब्लूडी कार्यालयाची तोडफोड करुन सायन-पनवेल महामार्गवर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध केला. येत्या दिवसात मनसे आंदोलन आणखीन तीव्र करेल, असं सांगण्यात आलंय.
राज ठाकरेंचा पाठिंबा
‘माझ्या मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्य आहे. जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर किमान आंदोलन तरी दिसेल’, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे.
राज ठाकरेंनी तुर्भेतील पीडब्लूडीच्या कार्यालयाच्या तोडफोडीचं समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काळात मनसैनिक खड्डेविरोधी आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्याची शक्यता वाढली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















