एक्स्प्लोर
सडेतोड कोळंबकर... वांद्र्याच्या निवडणुकीपासून राणेंच्या भाजपप्रवेशापर्यंत!
“भाजपमध्ये जायचं असेल, तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यामुळे पक्षाला किती फायदा होईल, याची जाणीव त्या पक्षाच्या नेत्यांना आहे.”, असेही सांगत कोळंबकरांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.
मुंबई : “राजकीय समीकरणं कधी बदलतील हे सांगता येत नाही. नारायण राणे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेत. मला जर निर्णय पटला तर मीही त्यांना मदत करेन.”, असे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे. कोळंबकर हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात.
कोण आहेत कालिदास कोळंबकर?
कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.
कट्टर राणे समर्थक कोळंबकर!
नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी जे आमदार राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले, त्यामध्ये आमदार कालिदास कोळंबकरही होते. विशेष म्हणजे राणेंसोबत काँग्रेसमध्ये आलेले बहुतेक आमदार त्यांना सोडून गेले, मात्र कोळंबकर अजूनही राणेंसोबत काँग्रेसमध्येच आहेत.
...तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये येतील : कोळंबकर
“भाजपमध्ये जायचं असेल, तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यामुळे पक्षाला किती फायदा होईल, याची जाणीव त्या पक्षाच्या नेत्यांना आहे.”, असे सांगत कोळंबकरांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.
...म्हणून राणे विधानसभेत पराभूत : कोळंबकर
“राणे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून स्वतःच्या मतदारसंघात आले म्हणून पराभूत झाले. त्यांनी पक्षाचा विचार आधी केला.”, असे कोळंबकर राणेंबाबत म्हणाले.
वांद्रे विधानसभा पोटनिवडणूक
“वांद्र्याच्या पोटनिवडणुकीत कोणी काम केलं आणि कोणी नाही, याची यादी माझ्याकडे आहे. काँग्रेसमध्ये काहींना राणे निवडून आले, तर त्यांची खुर्ची जाईल अशी भीती होती.”, असा आरोप कालिदास कोळंबकरांनी केला आहे.
काँग्रेसला घरचा आहेर
“काँग्रेसची कामाची पद्धत चुकते आहे, या मताचा मी आहे. सत्ता असताना ग्रास रूट धरून काम केलं असतं, तर ही वेळ आली नसती. बीडीडी चाळी, पोलीस बांधवांच्या घरांचा प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवा अशी मी मागणी केली. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी लक्ष दिलं नाही. शेवटी कामं झाली नाहीत. एवढ्या वर्षानंतर देवेंद्र फडणवीसांनी हा प्रश्न सोडवला म्हणून जनतेला फायदा झाला.”, असे सांगत कोळंबकरांनी फडणवीसांची स्तुती करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
काँग्रेसमध्ये दुजाभाव!
“काँग्रेसमध्ये नवीन आलेल्या लोकांना वाव नाही. मला मागूनही जबाबदाऱ्या मिळाल्या नाहीत. बाहेरच्या पक्षातून आलो याच नजरेतून कायम बघितलं गेलं.”, अशी खंतही कालिदास कोळंबकरांनी व्यक्त केली. शिवाय, काँग्रेसमध्ये नारायणराव आम्हाला घेऊन आले, आम्ही नाही आलो, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement