एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख
देशाच्या लष्कर प्रमुखपदी मराठी माणूस येणार आहे.
मुंबई : सध्या न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदावर मराठी माणूस असताना आता लष्कराची सर्वोच्च सूत्रंही मराठी माणसाच्या हाती येणार. नव्या वर्षात ले. ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.
महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. सेवा ज्येष्ठतेनुसार मनोज नरवणे यांची निवड करण्यात आली आहे. नरवणे यांचे वडील देखील हवाईदलात अधिकारी होते. आत्तापर्यंत मनोज नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.
जगातील बलाढ्या अशा गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्कराचे आता ते नेतृत्व करणार आहेत. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेतून त्यांनी घेतले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. शीख लाईट इनफंट्रीमध्ये सुरुवातीला त्यांनी काम केले. बिपीन रावत हे सुद्धा याच रेजिमेंटचे जवान आहेत. मनोज नरवणे यांच्या रुपाने जवळपास 33 वर्षानंतर मराठी माणसाकडे पुन्हा एकदा लष्कराचे नेतृत्व आले आहे. 13 लाख अधिकाऱ्यांचा फौजफाटा असणाऱ्या लष्कराचे प्रमुख म्हणून आता लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे काम पाहणार आहेत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील.
संबंधित बातम्या :
पूरग्रस्तांचे संसार सावरले, मात्र कोल्हापुरातील देवदूताचा संसार अद्यापही उघड्यावर
Nashik Army Aviation School | नाशिकमध्ये आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत सोहळा, चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement