एक्स्प्लोर

पूरग्रस्तांचे संसार सावरले, मात्र कोल्हापुरातील देवदूताचा संसार अद्यापही उघड्यावर

कोल्हापुरातील महापुरात यंदा सगळ्यांना उद्ध्वस्त केलं. अनेकांचे संसार उघड्यावर आले. हे संसार सावरण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. याच दरम्यान एक तरुण आपला संसार बुडाला तरी दुसऱ्यांचे संसार सावरत होता. मात्र आज पूर ओसरुन पाच महिने झाले तरी त्याचा संसार उभारला नाही.

कोल्हापूर : सचिन भोसले... व्हाईट आर्मीच्या माध्यमातून कोल्हापुरातील पुरात अहोरात्र काम करणारा तरुण. सांगलीमध्ये बचाव कार्य सुरु असताना सचिनचं घर जमीनदोस्त झालं. मात्र आज पूर ओसरुन पाच महिने झाले तरी सचिन यांचं घर उभं राहत नाही. याला काही तांत्रिक कारण देखील आहे. गरीब परिस्थितीमुळे सचिन यांच्या वडिलांनी एक घर घेतलं. मात्र त्याची कागदपत्र पूर्ण झाली नाहीत. ते घर पूर्वीच्याच मालकाच्या नावावर राहिलं. त्यामुळे आता हे पडलेलं घर सचिन यांना बांधता येत नाही. कोल्हापुरातील महापुरात यंदा सगळ्यांना उद्ध्वस्त केलं. अनेकांचे संसार उघड्यावर आले. हे संसार सावरण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. याच दरम्यान एक तरुण आपला संसार बुडाला तरी दुसऱ्यांचे संसार सावरत होता. मात्र आज पूर ओसरुन पाच महिने झाले तरी त्याचा संसार उभा राहिलेला नाही. 'एबीपी माझा'ने पुरातील देवदूत म्हणून सचिन भोसले यांना गौरवलं होतं. आता सचिन यांचा संसार दुसऱ्या एखाद्याच्या घरात आहे. आई, पत्नी आणि दोन मुली असा संसार सचिन हाकत आहेत. कोल्हापुरात 1999 मध्ये व्हाईट आर्मी स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. आपत्तीग्रस्तांना ही संस्था मदत करते. सचिन भोसले हे तेव्हापासून या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. देशभरातल्या अनेक आपत्कालीन परिस्थितीत सचिन भोसले मदतीसाठी धावून गेले आहेत आणि अनेकांचे जीव वाचवले आहेत. उत्तराखंडचा प्रलय, केरळचा पूर, माळीण गावातील दुर्घटना, तिवरे धरणफुटी ते कोल्हापूरचा महापूर, अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते मदतीसाठी धावून गेले होते. पाऊस आणि चोहोबाजूला पाणीच पाणी अशा परिस्थितीत सचिन भोसले आणि व्हाईट आर्मीने सैन्यातील जवानांच्या मदतीने कोल्हापूर, सांगलीत अक्षरक्ष: हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. सचिन भोसले यांचा संसार उभा राहावा यासाठी अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र आता काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. हे घर सचिन यांच्या नावावर नसल्याने सरकारी मदतही मिळत नाही. त्यामुळेच सचिन यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget