एक्स्प्लोर
भिवंडीत माती माफियांकडून कोट्यवधींची माती चोरी, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष
भिवंडी तालुक्यात राजरोसपणे माती उत्खनन सुरू आहे. मात्र, याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : महसूल खात्याचे सर्व अधिकारी गाढ झोपेत असतानाच भिवंडी तालुक्यातील पडघा बोरीवली-राहूर व देवळी परिसरातून केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील माती उत्खनन करण्याच्या प्रकारांचे पेव फुटले आहे. येथील अनेक ठिकाणी डोंगरांना या कंत्राटदाररुपी घुशी लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नाका खाली हे भूमाफिया माती उत्खनन करीत आहे, याची सुतराम माहिती देखली या अधिकाऱ्यांना नाही. भिवंडी तालुक्यात अनेक ठिकाणी सरकारी वनविभाग, गुरचरण, खासगी अशा जमिनीतुन माती माफिया बिंधासपणे माती चोरुन विकासकाला विकत आहेत. हे माती माफिया एखाद्या खासगी जागेवर माती काढणीची परवानगी मिळवून हळूहळू बाजूच्या वन जमिनी, सरकारी जमिनी व गुरचरणाच्या जमिनीवरही ताव मारुन माती काढून नेत असतात. बोरिवली परिसरात अशाच प्रकारे गुरुचरण जमिनीत झालेल्या उत्खननावर अधिकारी वर्गाने 2018 मध्ये कार्यवाही करत 24 कोटींचा 94 लाखांचा दंड ठोकत गुन्हा दाखल करुन तहसीलदाराने कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाची कोणतीही अंबलबजावणी झाली नाही. याउलट माती माफियानी दहापट अधिक डोंगराळ भागात माती उत्खनन करुन माती चोरुन नेली. त्यामुळे महसूल प्रशासन व भूमाफिया यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही तक्रारदार गोविंद माडेवार यांनी केला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष - एकीकडे माती उत्खननाला बंदी असताना दुसरीकडे मात्र दिवस-रात्र जेसीबी चालवला जात आहे. राजरोसपणे डंपरच्या माध्यमातून या मातीची वाहतूकदेखील सुरू आहे. मात्र, संबंधित गाव सरपंच व ग्रामसेवक व तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली-राहूर, देवळी या परिसर व इत्यादी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात माती उत्खनन सुरू असल्याने शासनाची अंदाजे 500 कोटीहून जास्त नुकसान झाल्याचे आरोप तक्रारदार गोविंद माडेवार यांनी केला आहे. तहसीलदारांना या घटनेची माहिती दिली. या तक्रारीवरुन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी घटनास्थळावर पाहणी करत उत्खनन झालेल्या डोंगर भागाचे मोजमाप मोजणी कार्यालयातर्फे केल्यानंतर नेमकी किती माती चोरी झाली आहे व शासनाचे किती नुकसान झालं आहे हे समजू शकेल. माती उत्खनन करणाऱ्या या माती माफियांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन तहसीलदाराने दिले आहे. परंतु पूर्वी झालेल्या कार्यवाही प्रमाणेच फक्त कागदावरच कार्यवाही होणार की प्रत्यक्षात अंबलबजावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. संबंधित बातमी - वाळू खोदकाम करताना ढीग अंगावर कोसळला, ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवक मृत जायकवाडी धरणाच्या डेंजर झोनमध्ये अवैध वाळू उपसा | औरंगाबाद | ABP Majha
आणखी वाचा























