एक्स्प्लोर
जितेंद्र आव्हाड आणि राज ठाकरेंची ‘कृष्णकुंज’वर भेट
शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट झाली.
मुंबई : शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, मात्र भेटीमागचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पण अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पक्ष नेता किंवा कार्यकर्ता म्हणून मी राज ठाकरेंच्या भेटीला आलो नव्हतो. तर मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आल्याचे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. मला त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील राज हे एक अभ्यासू नेते असून त्यांचे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व वाखणण्याजोगे असल्याचे त्यांनी सांगितले.
भेटीत व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रासमोरील भविष्यातील अडचणी यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले. ही केवळ वैयक्तिक भेट असून याचे कोणीही राजकीय अर्थ काढू नये असेही त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement