एक्स्प्लोर
अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय, तर पश्चिम महाराष्ट्रावर सरकार मेहरबान : देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अर्थमंत्री अजित पवार यांचं आजचं उत्तर हे केवळ राजकीय भाषण होतं, असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
मुंबई : विदर्भ, मराठवाड्यावर जिल्हा योजनांमध्ये अन्याय झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना सरकारने भरपूर निधी दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज उत्तरात जी आकडेवारी दिलीय ती दिशाभूल करणारी आहे. हे उत्तर नसून केवळ राजकीय भाषण असल्याचा टोला विरोधी फडणवीस यांनी सरकारला लगावला. अर्थमंत्र्यांचं आजचं उत्तर हे दिशाभूल करणारं असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय. दरम्यान, विरोध पक्षाने अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान झालं नसल्याचं सांगत सभात्याग केला.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांना आज उत्तर दिले. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्यानं विरोधीपक्षाने सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विदर्भ, मराठवाड्यावर जिल्हा योजनांमध्ये अन्याय झाला आहे. आधीच्या वर्षीपेक्षा कमी पैसे दिलेत. आज उत्तरात जी आकडेवारी दिलीय, ती दिशाभूल करणारी आहे. आमच्या पाच वर्षात एकाही जिल्ह्याची योजना कमी झालेली नाही, उलट वाढली आहे. नागपूर विभागातील जिल्ह्याच्या योजना 23 टक्क्यांनी कमी झाली. अमरावती विभागात जिल्ह्यांसाठी कमी पैसे दिलेत. तर, मराठवाड्यात अत्यल्प वाढ करण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील काही विभागात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितले.
मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!
विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय
अर्थमंत्र्यांनी काही आकडेवारी सोरीस्कररित्या सांगितलेली नाही. आजचे उत्तर केवळ भाषण होते. आजच्या अर्थसंकल्पात कर्जाच्या संदर्भात, राजकोषीय तुटीच्या संदर्भात, महसुलीच्या तुटीच्या संदर्भात, काहीही स्पष्ट माहिती दिली नसल्याचं फडणवीस यांनी म्हटंलय. हे पहिलेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल ज्यात ओपनींग, क्लोजिंग बॅलन्स सांगितलेला नाही. मराठवाड्यातील वॉटरग्रीडसाठीही या सरकारने विशेष तरतूद केली नाही. यावर टीका झाल्यानंतर 200 कोटींची तरतूद करण्यात आलीय. पश्चिमी वाहिन्यातून वाहून जाणरे 168 टीएमी पाणी मराठवाडा आणि विदर्भात आणण्याची योजना होती. त्याचा जीआर देखील काढला आहे. मात्र, याबद्दल एकही शब्द सरकारने काढला नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. कोकणाला देखील यात म्हणावी अशी तरतूद केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीमधील राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात
मराठवाड्यातील वॉटरग्रीडसाठी 200 कोटी, तर वरळीत पर्यटन केंद्रासाठी 1000 कोटी?
अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर प्रादेशिक असमतोलावरून हल्लाबोल चढवला. हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का? आणि असेल तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रात आहे का? हा प्रश्न अर्थसंकल्प पाहिल्यानंतर निर्माण होत असल्याची चिंता फडणवीस यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील वॉटरग्रीडसाठी 200 कोटी आणि वरळीतील पर्यटन केंद्रासाठी 1000 कोटी असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
विदर्भ, मराठवाड्यावर जिल्हा योजनांमध्ये अन्याय झाला आहे. आधीच्या वर्षीपेक्षा कमी पैसे दिलेत. आज सभागृहात उत्तरात जी आकडेवारी दिलीय ती दिशाभूल करणारी, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेले. तेथे दुसरे करायचे ना? हा कसला प्राधान्यक्रम असा थेट सवाल अर्थमंत्री अजित पवार यांना केला. तसेच मुद्रांक शुल्क पुणे, पिंपरी, मुंबई, नागपूर येथे कमी करून काहीही फरक पडणार नाही. कारण, तेथे आधीच एक टक्का अधिभार म्हणून वाढविण्यात आला होता, असा दावाही फडणवीस यांनी केला.
Devendra Fadnavis on Coronavirus | कोरोनाचा विषय राजकीय नाही, सरकारला सहकार्य करणार : देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement