एक्स्प्लोर
मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!
विधानसभेत आज 'चुकीला माफी नाही' हा डायलॉग घुमला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अजित पवार यांना टोला लगावला. त्यावर अजित पवार यांनी तोंडसुख घेत चुकीला माफी नाही म्हटलं.
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषणाच्या चर्चेला उत्तर देताना 'दगडी चाळ' चित्रपटातील 'चुकीला माफी नाही' हा डायलॉग विधानसभेत घुमला. अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेला हा डायलॉग विधानसभेत घुमण्याचं कारण ठरलं ते ज्योतिरादित्य शिंदे यांचं सीमोल्लंघन. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरील कमळ फुलायला लागलं. हाच धागा पकडून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.
"शिवसेनेला फसवलंय, पण सेना एवढी संमोहित झालीय की, त्यांना दिसत नाही. आम्ही चुकलोय, पण त्याचा एवढा फायदा घेऊ नका. तुमच्याकडेही ज्योतिरादित्य शिंदे होईल," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना चित्रपटाचा डायलॉग म्हणत उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले की, "सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही." हे वक्तव्य करताना अजित पवार यांनी बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही मानेने नकार देत चुकीला माफी नसल्याचं सूचित केलं. तसंच "आपलं सरकार होणार आहे, होणार आहे, असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तिकडे (भाजप) होणार नाही याची काळजी घ्या.
अजित पवार उत्तर देत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांच्या पहाटेच्या शपथविधी आठवण करुन दिली. या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यानंतर अजित पवारही आक्रमक झाले. "मी शपथ घेतली मान्य करतो. मी काही लपून करत नाही, तिथे गेलो, ते सोडून इथे आलो आणि आता मी इथे मजबूत बसलोय," असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला.
दोन गोष्टी अधोरेखित
अजित पवार यांच्या चुकीला माफी नाही या डायलॉगमुळे दोन गोष्टी आधोरेखित झाल्या. एक म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची चूक झाल्याचं मान्य केल. दुसरं म्हणजे भाजप अजूनही सत्तेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीत एखादा ज्योतिरादित्य सापडतोय का याच्या शोधात आहे.
राजकारणात सगळं शक्य आहे. पण तूर्तास नेत्यांच्या डायलॉगबाजीमुळे लोकांचं मनोरंजन मात्र नक्की होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement