एक्स्प्लोर

महाविकास आघाडीमधील राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात

राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीमधील तिढा अखेर सुटलेला दिसत आहे. राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जमा झाली आहे. राष्ट्रवादीकडून आधीच शरद पवारांनी अर्ज भरलेला आहे आणि आता चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीनं फौजिया खान यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीमधील राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड झालं आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असतील.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यानुसार तिन्ही पक्ष आपला एक-एक सदस्य राज्यसभेत पाठवू शकतो, मात्र चौथा सदस्य कुणाचा असेल यावरुन रस्सीखेच होती.

राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार ठरला, डॉ. भागवत कराड यांना संधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही होती. मात्र इथेही शरद पवारांचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसलं. त्यामुळे आता फौजिया खान राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार असतील.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे.

दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर, राहुल गांधींच्या विश्वासामुळे 45 व्या वर्षी राज्यसभेत

महाराष्ट्रातून कोण-कोण राज्यसभेवर जाणार? भाजप आपल्या आमदारांच्या संख्येवर तीन सदस्य राज्यसभेवर पाठवणार आहे. यामध्ये साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेत पाठवणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर जातील. याशिवाय काँग्रेसकडून युवा नेतृत्त्व राजीव सातव यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget