मुंबईत विना मास्क आढळल्यास आता महापालिकेसोबतच पोलिसही करणार कठोर कारवाई
बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्ये ‘विना मास्क’ वावरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी 200 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईत आता ‘विना मास्क’ आढळून आल्यास पालिकेसोबतच पोलिसही कठोर कारवाई करणार आहेत. पोलिसांच्या व वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने मुंबई महापालिका संयुक्त कारवाई करणार आहे. पुढील काळात गरज पडल्यास दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी निर्देश दिले आहेत.
सर्व 24 विभागांमध्ये दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘विना मास्क’ सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांवर 200 रुपये एवढी दंड आकारणी देखील करण्यात येत आहे. ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई पोलिस दल, वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व 24 विभाग कार्यालयांना दिले आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्ये ‘विना मास्क’ वावरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी 200 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत 40 हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये 1 कोटी 5 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार संबंधित संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे. ‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करणार आहेत.
मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई सुयोग्यप्रकारे व्हावी, याकरिता महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
COVID-19 RT-PCR Test | आरटी पीसीआर किटमार्फत कोविड टेस्ट कशी केली जाते?