एक्स्प्लोर
मुंबईतल्या असल्फा मेट्रो स्थानकालगतच्या परिसरातला आगडोंब कायम, थीनरचा कारखाना भस्मसात
असल्फ्याच्या खैराणी रोड या भागामध्ये अनेक लाकडाच्या वस्तू तयार करण्याचे कारखाने आहेत. अचानक या कारखान्याला भीषण आग लागली. एकापाठोपाठ एक कारखान्याला आग लागली असून या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मुंबई : मुंबई मेट्रोच्या असल्फा स्थानकाला लागून असलेल्या खैराणी रोडवर थिनरच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की दूरदूरवरुन धुराचे लोट दिसताहेत. थिनरच्या पिंपाचा स्फोट झाल्यानं आग भडकल्याचं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Fire | असल्फा मेट्रो स्टेशनलगतच्या परिसरात अग्नितांडव | ABP Majha
असल्फ्याच्या खैराणी रोड या भागामध्ये अनेक लाकडाच्या वस्तू तयार करण्याचे कारखाने आहेत. अचानक या कारखान्याला भीषण आग लागली. एकापाठोपाठ एक कारखान्याला आग लागली असून या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळं मोठाले ड्रम हवेत उडून स्फोट होताना दिसले. त्याचबरोबर थिनर गटारात वाहून आल्यानं गटारातूनही आगीच्या ज्वाळा भडकताना दिसल्या.
अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. तसेच खैरानी रोड परिसरात वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे.Maharashtra: Fire fighting operation underway at the factory in Ghatkopar, Mumbai; 15 fire tenders at the spot. pic.twitter.com/oUOmJTsq96
— ANI (@ANI) December 27, 2019
Maharashtra: Fire fighting operations underway at the factory in Ghatkopar, Mumbai; 15 fire tenders at the spot. https://t.co/GFdKLXA2M5 pic.twitter.com/8eg3m3eGYV
— ANI (@ANI) December 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement