एक्स्प्लोर
होर्डिंगवर भाऊ, साहेब विशेषणं लावायची नाहीत : आदित्य ठाकरे
होर्डिंगबाबत युवासैनिकांना सक्तीचे आदेश दिले आहेत. तोच नियम शिवसैनिकांनाही लागू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नवा नियम जारी केला आहे. होर्डिंगवर यापुढे भाऊ, दादा, भाई, साहेब, राव अशी विशेषणं लावायची नाहीत, अशी तंबी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली.
शिवाय जर कोणाचे होर्डिंग दिसले तर त्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. होर्डिंगबाबत युवासैनिकांना सक्तीचे आदेश दिले आहेत. तोच नियम शिवसैनिकांनाही लागू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंसह 5 नवे चेहरे शिवसेनेच्या नेतेपदी!
आदित्य ठाकरे यांच्या निर्णयाचं युवासैनिकांनी स्वागत केलं आहे.
दरम्यान, 23 जानेवारी रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागली होती. आदित्य ठाकरे यांच्यासह एकूण 13 जणांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली आहे.
शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!
अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement