कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; आज एका दिवसात 9518 रुग्णांची नोंद, 258 जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे दूर आधीपेक्षा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात आज एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज 9 हजार 518 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 15 लाख 64 हजार 129 नमुन्यांपैकी 3 लाख 10 हजार 455 (19.85 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 54 हजार 370 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 846 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 3 हजार 906 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त होऊ घरी परतले आहेत. तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.62 टक्के एवढं आहे. राज्यात आज 258 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 4.65 टक्के एवढा आहे.
Community Corona Spread | भारतात कोरोनाचा समूह संसर्ग, दररोज 30 हजार रुग्णांची वाढ चिंताजनक - IMA