एक्स्प्लोर
'मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी नाही', अशोक चव्हाणांची माहिती

मुंबई: मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही हे आता निश्चित झालं आहे. यासंदर्भात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. काँग्रेसचा समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र शिवसेना, भाजप आणि एमआयएमसोबत आघाडी केली जाणार नाही असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी 27 आणि 28 जानेवारीला बैठक होणार आहे. तर जिल्हा परिषदेसाठी 30 आणि 31 जानेवारीला बैठक असेल. दरम्यान, ‘राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे.’ असं स्पष्ट मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलं होतं. आघाडी होऊ नये याबाबत मुंबईच्या नेते-कार्यकर्त्यांची भूमिका ठाम असल्याचं निरुपम आधीच म्हणाले होते. संबंधित बातम्या: मुंबईत राष्ट्रवादीसोबत आघाडी अशक्य: संजय निरुपम
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























