एक्स्प्लोर
आरक्षण संपवण्याचा डाव, तो हाणून पाडा : भुजबळ
क्रोएशिया देश सुटला असेल, तर तिकडे पण जाऊन या, असा टोला भुजबळांनी मोदींना लगावला.

मुंबई : सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव असून, तो आपण हाणून पाडायला हवा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींना जादूची झप्पी दिली, मोदी काय वेगळं करतात, तेही वेगवेगळ्या देशांच्या पंतप्रधानांना जादूची झप्पीच देत सुटतात, अशा शब्दात भुजबळांनी मोदींना टोला लगावला. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शन शिबिरात छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “आज शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. कारण त्यांनी त्यांचा प्रभाग, त्यांच्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात आणि आपले कार्यकर्ते फक्त आदेश मागतात. यापुढे आदेश मागायचा नाही, एकतर नमस्कार नाहीतर चमत्कार असे काम करा.”, असे छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट ट्रेन आहे. मुंबईचं गुजरात करायचा डाव सुरु झालाय. पंतप्रधान कुठचे आहेत, देशाचे का गुजरातचे?, असा सवाल करत भुजबळांनी बुलेट ट्रेनलाही विरोध केला. क्रोएशिया देश सुटला असेल, तर तिकडे पण जाऊन या, असा टोलाही त्यांनी यावेळी मोदींना लगावला. राहुल गांधींनी मोदींना ‘जादूची झप्पी’ दिली, मोदी काय करतात, कुठलाही पंतप्रधान आला की मोदी ‘जादूची झप्पी’, असे म्हणत भुजबळांनी राहुल गांधींची पाठराखण केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























