अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही : गिरीश महाजन
अजित पवारांच्या राजीनाम्यामागे सध्या त्यांच्या पक्षात सुरु असणारा तणाव हे कारण असू शकतं किंवा कुटुंबातील अंतर्गत कलह हे सुद्धा कारण असू शकतं, असा अंदाजही गिरीश महाजन यांनी वर्तवला आहे.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलेल नाही. मात्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने ते अस्वस्थ झाल्याने त्यांनी तसा निर्णय घेतला असावा, असं खुद्द शरद पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनाही अजित पवारांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे याची त्यांच्या घरच्यांना देखील माहिती नाही. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही, असं गिरीश महाजन स्पष्ट केलं आहे.
- अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा, राजकीय क्षेत्रात खळबळ
- माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ, राजीनामा देण्याबाबत कल्पना दिली नाही : शरद पवार
अजित पवारांच्या राजीनाम्यामागे सध्या त्यांच्या पक्षात सुरु असणारा तणाव हे कारण असू शकतं किंवा कुटुंबातील अंतर्गत कलह हे सुद्धा कारण असू शकतं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पवारांच्या घरातील कौटुंबिक कलह पाहिला मिळाला. शरद पवारांना नातू पार्थ पवारसाठी एक पाऊल मागे यावं लागलं होतं. कारण संपूर्ण कुटूंब निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिसून आलं होतं. शेवटी एकाच कुटुंबातील किती जण निवडणूक लढवणार? त्यामुळे पवारांनी माघार घेत पार्थला उमेदवारी दिली होती. कारण सध्याची युवापिढी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.
अजित पवार राजीनामा देणार आहेत याची शरद पवार यांना माहिती नव्हती यावर कोण विश्वास ठेवणार? आणि जर खरंच पवारांना याबाबत काही माहिती नसेल तर तुम्हीच समजू शकता की पवारांच्या घरात किती टोकाचा संघर्ष आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.
VIDEO | Ajit Pawar Resignation | अजित पवारांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
संबंधित बातम्या