एक्स्प्लोर

पिझ्झापेक्षा सुपरफास्ट, बाईक अॅम्ब्युलन्स मुंबईकरांच्या मदतीला!

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकारने बाईक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे.

मुंबई: भल्या मोठ्या ट्रॅफिकच्या गर्दीत सायरन वाजत उभी असलेली अॅम्ब्युलन्स, असं चित्र मुंबईत बऱ्याच ठिकाणी दिसतं. मात्र आता हे चित्र काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता रस्त्यांवर ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ पाहायला मिळणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकारने बाईक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे. प्रथोमपचारासाठी जे जे आवश्यक असेल, ते ते सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये असेल. Bike Ambulance 3-compressed महत्त्वाचं म्हणजे या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असणार आहे. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकपाठोपाठ ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य ठरलं आहे.  सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर बाईक अॅम्ब्युलन्स सुरु कऱण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील अन्य शहरांतही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करण्यात येतील, असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं. Bike Ambulance 2-compressed याबाईक अॅम्ब्युलन्स सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत. मुंबईतील भांडुप, मानखुर्द, नागपाडा, मालाड, चारकोप,गोरेगाव, ठाकूरगाव, कलिना आणि खारदांडा या भागात या बाईक अॅम्ब्युलन्स असतील. अॅम्ब्युलन्ससाठी 108 क्रमांकावर फोन आल्यानंतर, त्या त्या भागात जवळ असलेली बाईक अॅम्ब्युलन्स संबंधित ठिकाणी धाव घेईल. याबाईक अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हातळण्यास सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे. अनेकवेळा अॅम्ब्युलन्स पोहोचूनही मोठ्या ट्रॅफिक जॅममुळे वाटेतच अडकून राहते. अशावेळी काहीही करता येत नाही. त्यामुळे रुग्णाला शक्य असूनही उपचार करता येत नाहीत, किंवा उपचारास विलंब होतो. आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या तासाभरात उपचार मिळणं आवश्यक असतं. ते न मिळाल्याने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र अशा ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ आता महत्त्वाच्या ठरणार आहेत. Bike Ambulance 1-compressed बाईक अॅम्ब्युलन्समुळे मोठा त्रास वाचणार आहे. अॅम्ब्युलन्सचा नंबर डायल केल्यावर बाईक अॅम्ब्युलन्स आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यानंतर बाईक अॅम्ब्युलन्सवरी डॉक्टर उपचार करतील. सुसज्ज बाईक अॅम्ब्युलन्समध्ये काय काय असेल?
  • प्रथमोपचाराची आवश्यक साधने
  • आपत्कालीन उपाचार साहित्य
  • हार्ट अटॅकवेळी द्यावयाची औषधं
  • ऑक्सिजन मास्क
  • विविध इंजेक्शन, गोळ्या
  • भाजलेल्या, बुडालेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार साहित्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget